गडचिरोली जिल्ह्यात स्क्रब टॉयफस आजाराचे तिन रुग्ण

645

स्क्रब टॉयफस जिल्यातिल धानोरा, कुरखेडा, वडसा या तालुक्यात तिन नविन रुग्ण

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 16 सप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यात आपण बघितला असेल मलेरिया डेंगू टायफाईड असे आजार होत असतात परंतु आज येथे नवीन आजार आपल्याला बघायला मिळत आहे स्क्रब टॉयफस हा एक नवीन आजार आहे स्क्रब टॉयफस आजाराबाबत माहिती व त्यावर करावयाच्या उपाययोजना स्क्रब टॉयफस हा आजार आरेटिया सुटसुगामुंशी या जिवाणू मुळे होतो. हे जिवाणू चिगार माईट नावाच्या किटकावर वाढतात. हे लहान चिगार किटक झाडाझुडपात व उंदीराच्या अंगावर वाढतात. या आजाराचा अधिशियन काळ हा १ ते ३ आठवडे आहे. स्क्रब टॉयफस आजार पसरण्याचे माध्यमः हे जिवाणू चिगार माईट नावाच्या किटकावर वाढतात. हे किटक उंदराच्या शरीरावर / गवतावर /झाडेझुडपात राहतात. • हे किटक माणसांना चावा घेऊन आजार पसरवितात.

स्क्रब टॉयफस आजाराचे लक्षणे:
तिव्र ताप, डोके दुखी, सांधेदुखी, जखम/खिपली, खाज/पुरळ व अंगावर चट्टे येणे.

उपाययोजना :

संपुर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालण्याविषयी जनजागृती करण्यात यावी.
घराच्या आजूबाजूला वाढलेले गवत, झाडेझुडपे नष्ट करणे किंवा तणनाशक फवारणे. घरातील उंदरांचा बंदोबस्त करणे व साफ-सफाईवर विशेष लक्ष देणे.
गवतात, झुडपात काम केल्यानंतर गरम पाण्याने कपडे स्वच्छ धुवावे.
ग्रामस्थांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावे.
चिगार माईट अळीचा नायनाट करण्यासाठी मॅलेथिऑन २५ टक्के अळिनाशकाची २:९८ (२ किलो मॅलेथिऑन व ९८ किलो रेती/ माती या प्रमाणामध्ये धुरळणी करावे.)
विदयार्थ्यांना शाळेमधून स्वच्छते बाबत आरोग्य शिक्षण देण्यात यावेत. आरोग्य कर्मचारी यांचे मार्फतीने या आजाराविषयी जनजागृती करण्यात यावी.
सदर आजाराचे लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे.
जिल्हयात आजपर्यंत ३ रुग्ण आढळलेले असून सदर रुग्णांची प्रकृती हि आटोक्यात आलेली आहेत.