गणपती विसर्जन ठरला काळोख

0
944

ट्रॅक्टर पलटल्याने 1 जागिच ठार तर 50 जखमी

लोकवृत्त न्यूज
चिमूर दि. 24 सप्टेंबर :- चिमूर जवळील नेरी पासून १५ किमी अंतरावरील काजळसर येथे गणपती विसर्जन करून ट्रॅक्टरने परत जात असतांना ट्रॅक्टर भर वेगात असल्याने दुर्घटना घडली व टाली अर्धवट पलटल्याने तेथिल जनरेटरमुळे  प्रेमीला गुलाब श्रीरामे वय (४० वर्ष) हिचा जागीच मृत्यू झाला. तर २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी त्यात १५ ते २० महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत.परतु त्या क्षणी ड्रायव्हर फरार झाला. घटनेची माहीती मिळताच चिमुर पोलिस  घटनास्थळी पोहोचले. व यांच्यावर उप जिल्हा रुग्णालय चिमुर तेथे प्रथमोपचार सुरु असून काहींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. याबाबत चिमुर शहरातील खासगी डॉक्टर सुद्धा तात्काळ मदतीसाठी उपजिल्हा ररूग्णालयात दाखल झाले. काजळसर परिसरात मोठ्यी खळबळ उडाली आहे व पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here