Home Breaking News नक्षलग्रस्त भागातील पोलीसांना दीडपट वेतन मिळणार

नक्षलग्रस्त भागातील पोलीसांना दीडपट वेतन मिळणार

726

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पूर्ण केला

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली-मुंबई, ३ ऑक्टोबर : नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी (पोलीस जिल्हा) व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी कर्मचारी दीड पट वेतनापासून वंचित होते. दीड पट वेतन मिळावे अशी मागणी होती, नुकतेच उपमुख्यमंत्री व गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले असता पोलिसांच्या दीड पट वेतनाबाबत विचारणा केली असता सोमवारी शासन निर्णय जाहीर होईल असा शब्द दिला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून नक्षलग्रस्त भागातील पोलीसांना दीडपट वेतन व महागाई भत्ता मिळणार आहे. तसे शासन निर्णय जारी करण्यात आले आहे.

नक्षलग्रस्त भागात कार्यरत संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाकडून नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना लागू केलेल्या इतर आर्थिक सवलती अनुज्ञेय असणार नाहीत. सदरची बाब संबंधित अधिकाऱ्यांनी विचारात घेऊन त्याप्रमाणे वेतन अदा करावे.
याबाबत येणाऱ्या वेतन व महागाई भत्त्यावरील अधिकचा खर्च या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात येतात, त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व तो मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. तसेच हे आदेश १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीच्या वेतनभत्त्यासाठी लागू राहतील. असे शासन निर्णयात जाहीर करण्यात आले आहे.

Don`t copy text!