आरमोरी: वाघांच्या हल्लात गुराखी ठार

0
524

-आरमोरी तालुक्यांतील घटना 

लोकवृत्त न्यूज
आरमोरी, 7 ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील देशपूर (कूरंजा) येथे वाघाच्या हल्ल्यात इसमाचा बळी गेल्याची घटना आज 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. खेमराज आत्राम (58) असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त महितीनुसार, देशपूर येथील खेमराज आत्राम हे आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत गुरे चारण्यासाठी जंगलात गेले असता गुरे चारतांना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला व काही अंतरापर्यंत फरकडत नेऊन त्यांना ठार केले. घटनेची माहिती गावातील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळ गाठून पाहण्यास गर्दी केली होती. तसेच यासंदर्भात माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली असता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले.

नागरिकांकडून वाघाला जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे वनविभाग वाघाला जेरबंद करणार का अशा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे आरमोरी तालुक्यात नागरिकांमध्ये भिंती चा वातावरण निर्माण झालेला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here