गडचिरोली: २ नक्षलवाद्यांना अटक

0
502

● शासनाने जाहीर केले होते एकुण १० लाख रुपयांचे बक्षीस.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ८ ऑक्टोबर:- दि. ०७/१०/२०२२ रोजी उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोमके सावरगाव परिसरात गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ०२ संशयीत व्यक्ती मिळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, ते नक्षलवादी असल्याचे समजले त्यावरून ताब्यात घेवून त्यांना पानक सावरगाव येथे अटक केली.

अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये

सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे वय २४ वर्षे रा. मोरचूल ता. धानोरा  हा माहे ऑक्टोबर २०१५ मध्ये टिपागड दलममध्ये भरती होवुन, डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून २०१८ पर्वत कार्यरत होता. त्यानंतर माहे ऑगस्ट २०१८ के २०२० पर्यंत कंपनी १० मध्ये कार्यरत होता व सन २०२० ते आतापर्यंत (पीपीसीएस) पडुन पार्टी कमेटी मेंबर म्हणून कंपनी १० मध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाने सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे याचेवर ८ लक्ष रूपये बक्षीस जाहीर केले होते.

समुराम ऊर्फ सुर्या घसेन नरोटे यय २२ वर्ष रा. मोरचूल ता. यानोरा जि. गडचिरोली यांचा समावेश आहे. तसेच नामे समुराम ऊर्फ सूर्या घसेन नरोटे हा जन मिलिशिया सदस्य असून, महाराष्ट्र शासनाने त्याचेवर २ लक्ष रूपयेचे बक्षीस जाहिर केले होते. सदर दोन्ही नक्षलवाद्यांचा खुन जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्हयामध्ये सहभाग असून, सदर अटक नक्षलवाद्यांचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

दोन्ही नक्षलवाद्यांची विचारपुस केली असता, त्यांना वरीष्ठ नक्षलवादी कॅडरकडुन उत्तर गडचिरोलीमध्ये दलम पूर्ववत करण्याकरीता पाठवल्याबाबतची माहीती दिली. परंतु या दोघांच्या अटकेमुळे त्यांच्या विघातक प्रयत्नांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल अधिक सतर्क होवून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे या वर्षी २०२२ मध्ये आतापर्यंत एकूण ११ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे शासनाने जाहिर केलेले एकुण बक्षीस ४२ लक्ष रूपये सदराची कारवाई मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात पार पडली.

सा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here