गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हयातील युवतींना मिळाले पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

0
201

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 22 ऑक्टोबर:- गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांचे संयुक्त विदयमाने जिल्ह्यातील युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देवून त्यांना नोकरी मिळविणे करीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे सा., यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आज दि. २२.१०.२०२२ रोजी एकलव्य धाम, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पाडण्यात आले.

सदर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दि. २१/०९/२०२२ ते दि. २२/१०/२०२२ पर्यंत एकूण ३०. दिवसांचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अखत्यारितील गडचिरोली, कुरखेडा व धानोरा तालुक्यातील सहभागी झालेल्या महीला उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या पाचव्या बॅचमध्ये एकुण १०० महिला उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला. आतापर्यंत घेण्यात आलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणा मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकुण ८८० युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवला असून प्रशिक्षणा दरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाचे वतीने लेखी परीक्षेकरीता आवश्यक अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले.

आज रोजी निरोप व स्वागत समारंभ कार्यक्रमास पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेले १०० महीला उमेदवार हजर होत्या. या दरम्यान महिला उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त केले तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळत असल्याबाबत गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे सा., तसेच रविंद्र भंडारवार, उप मुख्यकार्यकारी अधिकारी, न.प. गडचिरोली व सुधाकर गौरकर, सहा. प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र. गडचिरोली हे उपस्थित होते. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे / उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी, कमांडो ट्रेनिंग सेंटर, किटाळी चे सर्व प्रशिक्षक तसेच नागरीकृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here