अभाविप चि गडचिरोली जिल्हा समिती घोषित.
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ७ नोव्हेंबर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा अभ्यास वर्ग कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली येथे 5 व 6 नोव्हेंबर दरम्यान पार पडला. वर्गात प्रदर्शनी उद्घाटन ,प्रास्ताविक व उद्घाटन,अभाविप परिचय,सैद्धांतिक भूमिका,अभाविप कार्यपद्धती,महाविद्यालय काम,प्रवास ,संपर्क व संवाद,सक्षम शाखा,भाषण दत्ताजी दिडोळकर, व्यावहारिक सत्र या विविध विषयावर विविध प्रवर्तकांनी मार्गदर्शन केले.
या अभ्यास वर्गात अभाविप विभाग प्रमुख प्रा. मुनघाटे,प्रा डॉ दामोदर झाडे सर ,डॉ संदीप जी लांजेवार ,प्रा. स्वरगे तारगे गडचिरोली विभाग संघटन मंत्री शक्ती, नगर विस्तारक राहूल जी शामकुमार उपस्थित होते .या अभ्यास वर्गाची सुरुवात परिषद गीता पासुन सुरुवात करणात आली. परिषद गीत राहुल जी यांनी घेतले उद्घाटक नरेश बुद्देवार सर कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली ,चिरडे सर कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली ,प्रमुख उपस्थिती माजी नगर उपाध्यक्ष अनिल जी कुणघाडकर गडचिरोली . गडचिरोली विभाग संघटन मंत्री शक्ती केराम , प्रा. स्वरूप तारगे , वर्ग प्रमुख चेतन कोलते कार्यक्रम, सह प्रमुख मोनाली भगत यांच्या हस्ते दीप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून जिल्हा अभ्यास वर्गाला सुरुवात करण्यात आली
यांयावेळी समारोप सत्रात गडचिरोली विभाग संघटन मंत्री शक्ती जी केराम यांनी
येणारा वर्ष भराचे नियोजन सागितले तसेच गडचिरोली जिल्ह्याचे नाव अखिल भारतीय स्तरावर कसे पोहचेल या साठी आम्ही आपल्या जिल्ह्यात वर्षभर नवंनवीन उपक्रम रावबु तसेच अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे प्रतिपादन त्यांनी केले व विद्यार्थांना त्याचा कला गुणाची जाणीव करुन दिली.अभ्यास वर्गाच्या समारोप सत्रात जिल्हा संयोजक चेतन कोलते यांनी आगामी अमृत मोहत्सवानिमित्त वर्षभरात होणारे अभियान व योजनांची महिती दिली. विभाग प्रमूख प्रा. मुनघाटे यांनी जिल्हा समिती 2022-2023ची घोषणा केली. या अभ्यास वर्गाला विद्यार्थी -35 विद्यार्थीनी-45 प्राध्यापक-03
असे एकूण 83 कार्यकर्ता उपस्थित होते. यामध्ये जिल्हा संयोजक चेतन कोलते, जिल्हा सह संयोजक मोनाली भगत, चामोर्शी भाग संयोजक तुषार चुढरी, वडसा भाग संयोजक हिरालाल नरुटी, गडचिरोली भाग संयोजक प्रणय मस्के,जिल्हा सोशल मिडिया प्रमुख जयेश ठाकरे,सदस्य म्हणून कुणाल नैताम,पराग बन्सोड ,दिक्षा पिपरे , प्रा डॉ दामोदर झाडे सर , प्रा. देवेंद्र शिवनकर, प्रा . स्वरूप तारगे , निमंत्रित सदस्य प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, नगर विस्तारक राहूल जी शामकुमार विभाग संघटन मंत्री शक्ती केराम यांची घोषणा करण्यात आली










