शासकीय कार्यालयात महीलेचा विनयभंग करणाऱ्या अधिकारी अटक

643

शासकीय कार्यालयात महीलेचा विनयभंग करणा-या नराधमास पोलीसांनी ठोकल्या बेडया.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 21 नोव्हेंबर :- गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद गडचिरोली येथिल कार्य करत असलेल्या महिला हि वरीष्ठ सहायक (लेखा) येथे नौकरीवर असुन त्याच विभागात मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणून कर्तव्यावर असलेले ओंकार रामचंद्र अंबपकर  यांचे विरुध्द कलम354, 354 (अ) 354 (ड) 506 गुन्हा नोंद झाला असून ओंकार रामचंद्र अंबपकर याला अटक करण्यात आली आहे.

ओंकार याला मंगळवार दिनांक २२/११/२०२२ रोजी न्यायालयात पोलीस कोठडी रिमांड कामी हजर करण्यात येणार आहे

पुढील तपास मा. पोलीस अधिक्षक निलोत्पल सा, मा. अपर पोलीस अधिक्षक सा, गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली मा. प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी सा. गडचिरोली हे करीत आहे.