चिमूर येथे अतीक्रमण धारकांचे धरणे आंदोलन

261

तहसील कार्यालय चिमूर येथे 

लोकवृत्त न्यूज
चिमूर २९ नोव्हेंबर:- येथे अतिक्रमण धारकांना सरकारी गायरान जमिनीवरील केलेले निवासी अतिक्रमण काढने बाबत ,आंबोली, शंकरपूर, गदगाव, पिटीचुवा ,काग, शेडेगाव अशा अनेक गावातील नागरिकांना तहसील कार्यालय चिमूर येथून घरे पाडण्यासाठी नोटीस पाठवली असता आज तहसील कार्यालय चिमूर समोर डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोल करण्यात आले व अतिक्रमण धारकांना त्वरित पट्टे देण्यात यावे व त्यांच्यावर केलेली कार्यवाही थांबवावी या साठी निवेदन देण्यात आले या वेळी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक,चिमूर शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे, ओबिसी विभाग अध्यक्ष विलास डांगे,माजी बाधकाम सभापती कदिर चाचा शेख, मिडिया प्रमुख पप्पू भाई शेख,अविनाश पाटील,राजू दांडेकर,मनोज सरदार, धुरपताताई पाटील,शुभांगी नागदेवते,किरंताई तांबोळे, लताताई भोगे व समस्त गावातून आलेले शेकडो संख्येने नागरिक उपस्थित होते.