चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

475

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर ७ डिसेंबर: सावली तालुक्यातील निलसनी पेठगाव येथील शेतात गेलेला शेतकरी वाघाच्या हल्यात ठार झल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. कैलास लक्ष्मन गेडेकर (४७) असे मृतकाचे नाव असून निलसनी पेठगाव येथील रहिवाशी होता सावली वन परिक्षेतत्रा अंतर्गत येत असलेल्या उपवन क्षेत्र व्याहाड खुर्द परिसरातील निलसनी पेठगाव शेत जमीनी लगतचे असून या भागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचे वावर आहे. धानपिकाची सिजन असल्याने अनेक शेतकरी परिवारा सह शेतात काम करीत आहेत. ६ डिसेंबर रोजी शेतात गेला मात्र परत आला नसल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केले. दुसऱ्या दिवशी शेता लगत असलेल्या वनात त्याचा शोध घेतला असता वाघाच्या हल्ल्यात शरीराचे अवयव गायब असलेल्या अवस्थेत आढळून आले. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन शव ग्रामीण रुग्णालय सावली शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले आहे.
त्यामुळे या भागात वन्य जीवांची मोठी दहशत परिसरात असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीने शेती करायची तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत असून वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.

#tiger attack