Home Breaking News वाघाच्या हल्यात शेळी ठार, नागरिक दहशतीत

वाघाच्या हल्यात शेळी ठार, नागरिक दहशतीत

699

– वाघास जेरबंद करण्याची वारंवार मागणी, नागरिक दहशतीत

लोकवृत्त न्यूज
सावली, ३१ डिसेंबर: तालुक्यात वाघाचे हल्ले सुरूच असुन आज शनिवार ३१ डिसेंबर रोजी तालुक्यातील केरोडा टोली शेतशिवारात वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. रोशन जीवनदास सातपुते रा. केरोडा टोली असे शेळी मालकाचे नाव आहे.
रोशन सातपुते नेहमीप्रमाणे घरी असलेल्या शेळया चारावयास गेला असता शेत शिवारात वाघाने एका शेळीवर हल्ला करून ठार केले. वाघाने शेळीवर हल्ला केल्याने मात्र रोशन वाघापासून बाल बाल बचावला. परिसरात वाघाचे हल्ले वाढले असतांना परिसरातील नागरीक दहशतीत असून वाघाचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करत आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून बातमी लिहेस्तव वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

Don`t copy text!