प्रस्थापित निवडणूका आल्या नंतरच आपला फड उभा करतात आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नासाठी कायम रस्त्यावर -प्रा किसन चव्हाण

241

लोकवृत्त न्यूज
शेवगाव (प्रतिनिधी) ४ एप्रिल: – शेतीमालाला भाव भाव नाही ,नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही,पूर्ण दाबाने वीज मिळत नाही ,महागाई टोकाची वाढली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे आणि राज्यकर्त्यांचे मात्र बिलकुल लक्ष नाही सत्तेत असतांना करायचं नाही आणि सत्ता गेली वांझोट प्रेम दाखवायचं गळे काढायचे खोटी खोटी फक्त मतासाठी आंदोलने करायची एवढेच काम सत्ताधारी आणि विरोधक करत आहे निवडणुका आल्या की तमाशा सारखे आपले फड उभे करायचे आम्ही मात्र कायम सर्वसामान्यांच्या प्रश्नाठी कायम रस्त्यावर आहोत आणि भविष्यात ही राहणार आहोत लोकप्रतिनिधी च्या निष्क्रियत्यमुळेच नोकरशाही मुजोर झाली आहे त्यांनाही वठणीवर आणण्याचं काम भविष्यात केलं जाईल असे रोख ठोक पणे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण तहसील कार्यलयासमोरील भव्य एल्गार मोर्चाला मार्गदर्शन करतांना बोलत होते