शिवकल्याण संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

194

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी, १० जून : सामाजिक कार्याची वर्षपूर्ती एका सामाजिक कार्यातूनच व्हावी असा उदात्त हेतू ठेवून तालुक्यातील वालसरा येथे शिवकल्याण संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून संस्थेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या शिबिरात २० पेक्षा अधिक तरुणांनी सहभागी होत रक्तदान केले व सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन वालसरा ग्रामपंचायतचे सरपंच अरुण मडावी, संस्था अध्यक्ष अनुप कोहळे व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. शिबिरात अनुप कोहळे, अतुल दुधबले, मुकेश कोहळे, प्रभाकर कोपूलवार, गजेंद्र भुरे, गजानन कुनगाडकर, रोशन कुनघाडकर, देवानंद कुकडकर, अजय गव्हारे, नीलेश कुनघाडकर, नितीन कोठारे, संदीप कोपुलवार, अक्षय सातपुते, सौरव मडावी, लीलाधर सोनुले, तुषार पिपरे, राज कोहळे, आशीष कारडे, नीरज कोहळे आदी युवकांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय रक्त संकलन टीम, शिवकल्यान संस्था सदस्य जितेश शेट्टीवार, संतोषी सुत्रपवार, प्रवीण चलाख, अविनाश आचला, प्रेरित कोठारे, निहाल शेळकी, सोशल मीडिया डिझायनर आशीष म्हशाखेत्री, आदित्य सातपुते, रोशन कोहळे, गौरव कोल्हटवार, मयूर गावतुरे आदींनी सहकार्य केले.