कोर्ट टी-पॉईंट कोटगल मार्ग ५ जुलै ला रहदारीसाठी बंद

0
552

Lokvrutt news
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २ जुलै :- गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे की, दिनांक 05 जुलै 2023 वार बुधवार रोजी महामहीम राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू  ( rashtrapati shrimati draupadi murmu ) यांचा गडचिरोली दौरा नियोजित आहे. तरी दिनांक 05 जुलै रोजी होणा­या दौ­याच्या अनुषंगाने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट दरम्यानचा मार्ग दिनांक 05 जुलै वेळ सकाळी 05.00 वा. ते सायंकाळी 05.00 वा. पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर करु नये.
महामहीम राष्ट्रपती श्रीमती. द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणा­या गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमासाठी येणा­या नागरिकांच्या वाहनाच्या पार्किंगची सोय टी-पॉईंट येथील खुल्या मैदानात केली असून, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (व्हि.व्हि.आय.पी.) वाहनांची सोय मृदा संवर्धन कार्यालय, या ठिकाणी केलेली आहे. तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here