शासन आपल्या दारी

0
652

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री जिल्हा दौऱ्यावर

लोकवृत्त न्यूज गडचिरोली,7 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सकाळी 11.00 वाजता शासन आपल्या दारी कार्यक्रमास एम.आय.डी.सी. मैदान कोटगुल रोड, गडचिरोली येथे उपस्थिती. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा (व्ही.सी.द्वारे).

त्यानंतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमास मुख्यमंत्री यांचे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, विधान परिषद सदस्य, सुधाकर अडबले, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, विधानसभा सदस्य देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त , नागपूर विभाग, विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली नागपूर परिक्षेत्र, संदीप पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

 ८ जुलै ला रहदारीसाठी बंद

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे शासन आपल्या दारी ” या कार्यक्रमाकरीता  अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी

कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट, एम. आय. डी. सी. मार्ग, शासकीय विश्रामगृह मार्ग चंद्रपुर रोड, मा. जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग आणि कॉम्प्लेक्स रोड हे मार्ग दिनांक ०८ जुलै वेळ सकाळी ०६.०० वा. ते सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here