एनएसयूआयच्या गडचिरोली जिल्हा जिल्हाध्यक्ष पदी निशांत वनमाळी यांची नियुक्ती

0
85

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 4 फेब्रुवारी:- एनएसयूआय चे राष्ट्रीय अध्यक्ष वरुण चौधरीजी आणि प्रभारी कन्हैया कुमार जी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआय चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी गडचिरोली जिल्हा एनएसयूआय च्या जिल्हाध्यक्ष पदी निशांत वनमाळी यांची नियुक्ती केली आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे नेते, माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते ना. विजय भाऊ वडेट्टीवार व महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निशांत वनमाळी यांना जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
यावेळी नियुक्ती पत्र देताना माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्याचे आदिवासीं काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष हसन भाई गिलानी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, उद्योगपती कुर्जेकर, निखील सुरमवार, डॉ विनय उसेंडी, आदी युवा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here