गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील ‘या’ उमेदवारावर आहेत गंभीर गुन्हे दाखल

207

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील ‘या’ उमेदवारावर आहेत गंभीर गुन्हे दाखल

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध उमेदवारांकडून प्रचार, भेटी सुरू आहेत. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात १० उमेदवार रिंगणात आहेत. मात्र उमेदवारांचे शिक्षण, संपत्ती, त्यांच्यावर असलेले गुन्हे याबाबत मतदाराला काही ठाऊक आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचा विचार केल्यास या क्षेत्राकरिता १० उमेदवार रिंगणात आहेत. अशातच उमेदवारांकडून प्रचार, मतदारांच्या घरभेटी, विविध आश्वासन सुरू आहेत. या दहाही उमेदवारांच्या शिक्षण, संपत्ती, तसेच कोणावर किती गुन्हे दाखल आहेत याबाबत आम्ही तपासले असता.काही उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत, काहींची संपत्ती लाखोंच्या घरात आहेत तर गुन्हेगारी बाबत तपासले असता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्यावर विनयभंग व लैंगिक अत्याचार तसेच विविध कलमनाव्ये गुन्हा दाखल आहे. ते उच्च माध्यमिक शिक्षक आहेत. त्यामुळे एकूणच त्यांच्यावर मतदार संघात रोषही व्यक्त करण्यात येत असल्याचे कळते.