देसाईगंज : ज्यांची मदत केली त्यांनीच केली चोरी, पोलिसांनी केली अटक

1071

देसाईगंज : ज्यांची मदत केली त्यांनीच केली चोरी, पोलिसांनी केली अटक

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.९:- ब्रम्हपूरी ते देसाईगंज मार्गावर एका दांपत्याने आपले चारचाकी वाहन थांबवून दोघांची मदत करीत वाहनात बसविले मात्र त्या दोघांनी त्यांच्याच वाहनातून चोरी केल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी मयंक रविंद्र सेंदरे, (वय 24 ) रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज व त्याचा साथीदार विधिसंघर्षित बालक रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज यास अटक करण्यात आली आहे. आरोपी मयंक सेंदरे यास न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.
५ सप्टेंबर रोजी देसाईगंज पोलीस येथील प्रियंका विवेक मेश्राम ह्या आपल्या पतीसह एम एच 02 बी वाय 3565 क्रमांकाच्या चारचाकी वाहने
ब्राम्हपूरी मार्गे देसाईगंज येथे येत होते. दरम्यान चिचोली येथील अण्णा बार समोर आरोपींनी त्यांना वाहन थांबवून मदत मागितली असता दोघांना वाहनात बसवले. मात्र मेश्राम दांपत्याने घरघुती सामान ठेवलेली बॅग व छोट्या पर्समध्ये चार नग सोन्याची अंगठी ठेवलेली एक बॅग अशा दोन बॅग गाडीच्या सीटमागे ठेवली असता त्या आरोपींनी पळवल्या. दरम्यान याबाबत कळताच प्रियंका मेश्राम यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच पोलिसांनी अवघ्या १२ तासात आरोपीना अटक केली आहे.
गुन्ह्रात चोरीस गेलेला माल एकुण 04 नग सोन्याच्या अंगठ्या वजन अंदाजे 24 ग्रॅम, किंमत 72,000/- रु. असा संपूर्ण मुद्देमाल आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात आला. तसेच सदर गुन्ह्रात विधिसंघर्षित बालकाचे पालक यांना सूचनापत्र देऊन बाल न्यायमंडळापुढे हजर करण्याबाबतची तजवीज ठेवलेली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. संदिप आगरकर करीत आहेत.