गडचिरोली : बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम मध्ये कचऱ्याचा ढिगारा

406

– बँकेचे दुर्लक्ष

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१० :- एटीएम सुविधा ही ग्राहकांना वेळोवेळी पैसे काढण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे असताना गडचिरोली शहरातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये कचऱ्याचा ढिगारा असल्याचे विदारक चित्र दिसून आले.


गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद शाळेच्या पुढे बँक ऑफ बडोदा शाखेच्या बाजूला असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये प्रस्तुत प्रतिनिधी गेले असता कचऱ्याचा मोठा ढिगारा पहावयास मिळाला. यावरून असे लक्षात येते की जेमतेम तीन चार दिवसापासून कचरा जमा झाला असावा. एटीएम मशीन मधून पैसे काढल्यास, अथवा बॅलन्स तपासल्यास एक पावती निघत असते त्याचा संपूर्ण ढिगारा एटीएम मशीन आवारात पहावयास मिळाला. यावरून बँकेचे कशाप्रकारे लक्ष आहे हे दिसून येत असून बँकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. डिजिटल युगात अनेक कामे डिजिटल झाली आहे, अनेक कार्यालये पेपर लेस होत आहे मात्र एटीएम मशीन मधून निघणाऱ्या पावतीचा ढिगारा बघून त्याला अपवाद असल्याचे दिसून येथे. कधी एटीएम मधिन मध्ये पैसे नसतात त्यामुळे ग्राहकांना खाली हात परतावे लागते मात्र या एटीएम मधील पावतीचा ढिगारा बघून काही दिवसापासून याकडे लक्षच नसल्याचे दिसून येत आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Bank of Maharashtra Gadchiroli)