– राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना AIMIM पक्षातर्फे जिल्हाधिकारी मार्फत निवेदनतून मागणी .
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२१ :- जिल्हा अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो त्यात मुबलक प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध असून त्यातही जिल्ह्यातील विद्युत आकारणी कर हा नागरिकांच्या माथाडी पडत असून सदर कर कमी करण्यात यावा अशी मागणी AIMIM पक्षातर्फे जिल्हाधिकारी मार्फत राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस
यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, गडचिरोली जिल्ह्यात सूरजागढ लोह खनिज व कोन्सरी प्रकल्पातून राज्य सरकारला खुप मोठा आर्थिक बळ मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना या कंपनीमध्ये नोकरी दिली जात नाही पर राज्यातील लोकांनां ह्या कंपन्या रोजगार देत आहे. तुम्ही ऊर्जामंत्री आहात, तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे रूपये देऊन लाडक्या भावाच्या खिशातून विद्युत आकारणी कर भरमसाठ वसूल करत आहात. आज महागाई वाढली आहे, गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही रोजगार नाही शेतकरी, शेतमजूर, मोल मजुरी करणारे मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांनां एवढे भरमसाठ विद्युत आकारणी कर भरणे शक्य नाही. ज्या विद्युत धारकांना पाचशे, सहाशे रुपये विद्युत आकारणी कर यायचे त्यांना आता अडीच हजार रुपये विद्युत आकारणी कर येत आहे. ज्या विद्युत धारकांना दोन हजार रुपये विद्युत आकारणी कर यायचं त्यांना आता दहा हजार रुपये विद्युत आकारणी कर भरणे शक्य नाही. भरमसाठ येणाऱ्या विद्युत आकारणी कर तात्काळ कमी करण्यात यावे. अन्यथा गडचिरोली जिल्ह्यातील विद्युत धारकांना विद्युत आकारणी कर भरू देणार नाही आणि महावितरण कंपनीला विद्युत धारकांची विद्युत पुरवठा कापू देणार नाही.लाडक्या बहिणीचा विचार करून जसे बहीणीला पंधराशे रुपये देत आहात तसे लाडक्या भावांचा विचार करून विद्युत आकारणी कर कमी करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, महीला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष जावेद शेख, युवा नेते दिलीप बांबोळे, महीला जिल्हा सचिव शमीना शेख, शगुफ्ता शेख, नसीमा शेख यांनी दिले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #MINISTRY OF POWER )










