आ.डॉ देवराव होळी हेच भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार

142

महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार होळी यांना विजयी करण्याचा निर्धार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली:- गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विकासासाठी झटणारे व सर्वसामान्य मध्ये मिसळणारे लोकांचे नेतृत्व आमदार डॉ. देवराव होळी हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्याची क्षमता असलेले नेते असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे ते विजयी उमेदवार असल्याचा सूर भाजपा शिवसेना सह अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये निघाला.
गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, शिंदे गटाचे जिल्ह्याचे प्रमुख हेमंत जंबेवार जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे , विधानसभा प्रमुख प्रमोद पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेशभाऊ भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, जेष्ठ नेते डॉ. तामदेव दुधबळे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, यांचे सह भाजपा, शिवसेना शिंदे गटाचे व अजित पवार गटाचे तालुक्याचे शहराचे अध्यक्ष ,प्रमुख , व महामंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित सर्व महायुतीच्या नेत्यांनी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. देवराव होळी यांनी विधानसभा क्षेत्रात विविध विकास कामे आणली असून आजपर्यंत एकाही आमदाराला जे शक्य झाले नाही ते त्यांनी करून दाखवले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता आमदार डॉ. होळी यांच्या पाठीशी असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपा महायुतीचे विजयाचे उमेदवार असल्याने येणारा काळात त्यांना भाजपाने उमेदवारी द्यावी. त्यांना जिंकून आणण्यासाठी सर्व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या ताकतीने कामाला लागतील असा विश्वास या बैठकीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.