लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ३/४ चे पद भरती प्रक्रिया असून या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावी अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे .
१० डिसेंबर पासून वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथील वर्ग ३ व ४ ची भरती प्रकिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रकियेचे कंत्राट BVG कंपनीला देण्यात आले असून या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिकांना प्राधान्य न देता इतर जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देण्यात येत असल्याची बाब बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाला कळताच BVG कंपनीच्या मॅनेजर सागर शिंदे यांच्याशी भेट घेऊन स्थानीकी बेरोजगारांना या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी याबाबात नक्कीच विचार करु असे आश्वासन दिले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी डीन डॉ. टेकाडे यांनी यामध्ये माझा कसलाही प्रकारचा हस्तक्षेप नाही हे सर्व शासनाने भरतीचे आदेश बीवीजी कंपनीला दिले आहेत अशी माहिती दिली.
या प्रसंगी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबोळे, जिल्हा प्रभारी तुषार रामटेके, जिल्हा महासचिव अरविंद वाळके, जेष्ठ नेते चंद्रप्रकाश जी गेडाम, युवा अध्यक्ष वैभव दरडे, महिला जिल्हा अध्यक्ष विद्याताई कांबळे, महिला जिल्हा सचिव रेखा कुंभारे, महिला जिल्हा उपाध्यक्ष आवडती वाळके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.










