गडचिरोली : हृदयविकारचा झटक्याने पोलीस शिपायाचा मृत्यू

1284

– भामरागड तालुक्यात नक्षलविरोधी अभियान सुरू असताना घडली घटना
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १३ : नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाचे जवान महेश नागुलवार यांना वीरगती आली त्या दुःखातून सावरत नाही तोच जिल्हा पोलीस दलाने आणखी एका पोलीस जवानांस गमावले आहे. विशेष कृती दलाचे पोलीस जवान रवीश मधुमटके यांचा हृदयविकारचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना काल काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
मिळाल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई रवीश मधुमटके हे कियार ते आलापल्ली रस्त्यावरील रोड ओपनिंग अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी ते आपल्या पथकासोबत रवाना झाले होते. यादरम्यान पोलीस स्टेशन कोठीपासून ५ किलोमीटर चालल्यानंतर, त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली असता त्यांना तात्काळ भामरागड येथील ग्रामीण आरोग्य केंद्र/आरएचसी येथे हलवण्यात आले होते, मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले होते. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक मत डॉक्टरांनी व्यक्त केले असून आज त्यांचा अंत्यविधी गडचिरोली येथे होणार आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #police news #naxali news )