गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर लैंगिक अत्याचार

1629

– आरोपीस केली अटक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५ : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना गडचिरोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी मनोज सुंदरलाल धुर्वे (वय ३० ) रा. आलपल्ली ता.अहेरी जि.गडचिरोली यास अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपाई असुन त्याचे पिडीत युवतीशी फेसबुकच्या माध्यमातुन ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर त्याने युवतीची शारीरिक संबध प्रस्थापित करण्याची मागणी केली. दरम्यान पिडीत युवतीने मनोजकडे लग्न करण्याची मागणी केली असता आरोपी मनोजने लग्नाचे वचन देत वारंवार लैगिक अत्याचार केला व १० फेब्रुवारी २०२५ पासून युवतीशी बोलने बंद करून लग्नास नकार दिला. लग्नाचे आमिष दाखवून लैगिक अत्याचार केल्याबाबत पिडीत युवतीने गडचिरोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असता पोलीस शिपाई मनोज धुर्वे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews  #gadachiroli police #crime )