Home गडचिरोली गडचिरोली नगर परिषदेची धडक कारवाई: 10 मालमत्ता सील,

गडचिरोली नगर परिषदेची धडक कारवाई: 10 मालमत्ता सील,

323

12.86 लाखांची कर वसुली
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २५: नगर परिषद गडचिरोलीच्या आदेशानुसार थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. कर वसुली पथक व पोलिसांच्या सहकार्याने थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करत 10 मालमत्ता सील करण्यात आल्या.

जप्तीच्या भीतीने अनेक मालमत्ता धारकांनी त्वरित कर भरला, ज्यामुळे एकूण 12.86 लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

या कारवाईत कर अधीक्षक मोरेश्वर पेंदाम, कर निरीक्षक स्वप्नील घोसे, निलेश करमणकर, शैलेंद्र बुक्कावार, तसेच कर लिपिक सुनील पुण्यप्रेड्डीवार, अमित भांडेकर, अशोक रामटेके, शशिकांत गजभिये, कैलास डुंबरे आणि इतर कर्मचारी खुशाल बाळेकरमणकर, बबू शेख, रमेश मुरमुरवार, नंदेश्वर कतले, विनोद पीपरे, सुनील कटाईत, संतोष मुंघांटे, स्वप्नील खोब्रागडे, दिनेश धोटे, धीरज रामगिरवार, अनिल शिवणकर, तुषार किरमे, राकेश येरमलवार, अविनाश वाटगुरे उपस्थित होते.

नगर परिषदेमार्फत थकीत व चालू मालमत्ता धारकांना कराचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून जप्तीची कारवाई टाळता येईल.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #नगर परिषद गडचिरोली)

Don`t copy text!