गडचिरोली : निवृत्त महिला अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी भाडेकरूला अटक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 18:- नवेगाव येथील निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (वय 64) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत भाडेकरू विशाल ईश्वर वाळके (वय अंदाजे 40) याला अटक करून गुन्हा उघडकीस आणला.
१३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सदर घटना घडली होती. आरोपीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून उंदिरवाडे यांच्या डोक्यावर घातक हत्याराने वार करत त्यांची हत्या केली आणि अंगावरील दागिने घेऊन फरार झाला. विशेष म्हणजे, आरोपीने कोणताही प्रत्यक्ष पुरावा मागे न ठेवता गुन्हा केला होता.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या नेतृत्वात तीन विशेष तपास पथके तयार करण्यात आली. या पथकांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. संशयित विशाल वाळके याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. विशाल वाळके हा मयत महिलेच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. आर्थिक विवंचनेमुळे त्याने हा अत्यंत अमानवी कृत्य केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपीला गडचिरोली न्यायालयात हजर करण्यात आले असून, २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांचे मार्गदर्शनात पोस्टे गडचिरोलीचे पोनि. रेवचंद सिंगनजूडे, स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, सपोनि. राहूल आव्हाड, पोस्टे गडचिरोलीचे सपोनि. विजय चव्हाण पोउपनि. दिपक चव्हाण, मपोउपनि. विशाखा म्हेत्रे व अंमलदार यांनी पार पाडली.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Gadchirolipolice @gadachirolipolice #crime)













