सायकलस्वाराला वाचवताना स्कॉर्पिओ उलटली ; चालकाचा मृत्यू, सहकारी गंभीर

993

सायकलस्वाराला वाचवताना स्कॉर्पिओ उलटली ; चालकाचा मृत्यू, सहकारी गंभीर

लोकवृत्त न्यूज,
सावली (दि. १७) :सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील नंदनी बिअर बारजवळ आज १७ मे रोजी एक दुर्दैवी अपघात घडला. गडचिरोलीवरून व्याहाडकडे येत असलेली MH 33 AC 8712 क्रमांकाची स्कॉर्पिओ अचानक रस्त्यावर आलेल्या सायकलस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित झाली. त्याचवेळी मागील टायर फुटल्याने गाडीने नियंत्रण गमावले आणि पलटी झाली.

या अपघातात स्कॉर्पिओचा चालक अनिरुद्ध कोवे (वय २५, रा. केरोडा) याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी असून त्याला तातडीने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने, अनिरुद्ध कोवे यांचा मृत्यू रुग्णालयात नेण्यापूर्वीच झाला.

घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Chandrapur Police #accident)