– जिल्ह्यात दहावीला प्रथम येणाऱ्या शौर्यचा घरी जाऊन सत्कार; पालकांचेही अभिनंदन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. 25 :- बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी) गडचिरोलीच्या वतीने आज जिल्ह्यात इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शौर्य सुधाकर रायपुरे याचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला. शौर्यने यावर्षी 97.2 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अग्रस्थानी आपले नाव कोरले आहे.
बीआरएसपीच्या शिष्टमंडळाने शौर्यच्या राहत्या घरी जाऊन त्याला गौरवचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचे तसेच त्याचे आई-वडिलांचे अभिनंदन केले. शौर्यच्या यशामागे कुटुंबाचा मोलाचा वाटा असल्याचे सर्वांनी नमूद केले. या वेळी त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार प्रसंगी बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, महासचिव अरविंद वाळके, ज्येष्ठ नेते जयप्रकाश गेडाम, विलासभाऊ कुंभारे, शेखर गेडाम, आकाश बांबोळे, नामदेव दरडे, वैभव दरडे, चंद्रकांत रायपुरे, मिथुन गेडाम, तसेच पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम यापुढेही सुरू राहील, असे जिल्हाध्यक्षांनी सांगितले. शौर्य रायपुरे यानेही आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि अभ्यासातील सातत्याला दिले.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #BRSP)

