वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
लोकवृत्त न्यूज
कोरची दि.26 :- कुरखेडा या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 8 किलोमीटर चे वळणी घाट असून या मार्गावर नेहमी हलक्या तसेच जड वाहनांची वर्दळ असते परंतु रस्ता अतिशय संकीर्ण असल्यामुळे नेहमी या मार्गावर वाहने नादुरुस्त होऊन उभे असतात
काल मध्यरात्री सुमारे 2 च्या दरम्यान छत्तीसगड येथून बेंगलोर कडे जात असलेला ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे वाहनांची सुमारे 5 ते 6 किलोमीटर लांबच लांब रांग दिसून आली
मुख्य एका गरोदर महिलेला सुद्धा 5 तास या जाम मध्ये फसून राहावे लागले तसेच काही चिमुकले सुद्धा पाणी व जेवणाविना त्यांनी रात्र काढली, एका शासकीय बस मध्ये सुद्धा प्रवास करणाऱ्या 40 प्रवास्यांना सुद्धा तब्बल 5 तास वाट बघावी लागली
महत्वाचे म्हणजे रस्ता सुरळीत करण्याकरिता कुठलेही शासकीय कर्मचारी उपस्थित झाले नव्हते म्हणून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या मार्गावर सुरजागड येथील लोहखनिज घेऊन जाणाऱ्या ट्रॅकमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत हे विशेष.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra )

