राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ

114

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१४ : – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ शनिवार, दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.
कार्यक्रमानंतर पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, अनेक नविन कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. यानंतर केक कापून राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, जिल्हा सचिव डॉ. राजेंद्र गडपल्लीवर, मनविसे अध्यक्ष स्वप्नील वाढई, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष इंजी. अंकुश संतोषवार, वाहतूक जिल्हा संघटक विकेश भुरसे, तसेच सचिन येणप्रेडडीवार, गोपाल बावणे, मनीष बावणे, शुभम कमलापूरवार, आशिष खडसे, आकाश कुळमेथे, पवन कोसणकर, गोलू गटलेवार आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक समस्यांकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले जाईल व नागरिकांना थेट पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संपूर्ण वातावरण उत्साही व प्रेरणादायी होते.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @मनसे #RajThackeray )