– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणादायी विचारांना डॉ. होळींचा प्रतिसाद
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १२३ वा भाग आज देशभर प्रसारित झाला. हा कार्यक्रम गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी छत्तीसगड राज्यातील प्रवास दौऱ्यादरम्यान दूरदृष्य प्रणालीद्वारे ऐकला.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अंतरराष्ट्रीय योग दिनाचे यश, देश-विदेशातील लोकांचा योगातील उत्साह, बचत गटातील महिलांचे प्रेरणादायी कार्य, निसर्ग संरक्षणाचे महत्व, पवित्र यात्रांचे आध्यात्मिक महत्त्व, तसेच आणीबाणीच्या काळातील ऐतिहासिक आठवणी यावर विचार मांडले. विशेषतः व्हिएतनाममध्ये नेण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांवर त्यांनी केलेल्या भाष्याने ऐकणाऱ्यांना आध्यात्मिक दृष्टीकोनात चिंतन करण्यास प्रवृत्त केले.
डॉ. देवराव होळी यांनी यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मन की बात हा कार्यक्रम प्रेरणा देणारा असून, देशवासीयांमध्ये सकारात्मकता, आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्ती जागवणारा आहे. प्रत्येक भारतीयाने हा संवाद ऐकावा, असे त्यांना वाटते.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून, पंतप्रधानांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण ते जागतिक पातळीवर भारताचा ठसा कसा उमटतो हे स्पष्ट झाले.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @मन की बात #dr.deorao_holi_mla)

