महिला काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम ; नवेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
लोकवृत्त न्यूज
नवेगाव, दि. ३० जून :- शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री सर्व विद्यार्थ्यांना समानपणे उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महिला काँग्रेसने सामाजिक बांधिलकीतून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. नवेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत महिला काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात कविता उराडे व शालिनी पेंद्दाम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक्स वितरित करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पालकांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
महिला काँग्रेसकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य पोहोचवणे ही केवळ मदत नव्हे तर सामाजिक बांधिलकीची जाणीव असून, शिक्षणप्रेम व जबाबदारीची भावना जोपासण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान अनेकांनी महिला काँग्रेसच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
“महिलांनी केवळ कुटुंबापुरतेच नव्हे तर समाजहितासाठीही पुढे आले पाहिजे. शिक्षण हाच खरा विकासाचा मूलमंत्र आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी महिला काँग्रेस सदा सक्रिय राहील,” असे प्रतिपादन कविता उराडे यांनी यावेळी केले.
हा उपक्रम इतर शाळांमध्येही राबवण्यात यावा, अशी अपेक्षा शिक्षक व ग्रामस्थांनी व्यक्त केली. महिला काँग्रेसच्या या कार्यामुळे समाजातील महिलांची शैक्षणिक क्षेत्रातील जबाबदारी आणि भान अधोरेखित झाले आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Congress )

