गडचिरोलीत गोमांस विक्रीचा थरार : २५ किलो जप्त, मुख्य आरोपी अटकेत

717

– उर्वरित दोघे फरार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १३ :- इंदिरा नगरमध्ये मुस्लीम कुटुंबाकडून अवैध गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान २५ किलो गोमांस जप्त करण्यात आले, तर गोमांस वाहून आणलेली मारुती रिट्झ (MH 31 DV 1533) गाडी ताब्यात घेण्यात आली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आभा गजभिये यांना पाचारण केले. त्यांनी नमुने चार प्लास्टिक डब्यांत सीलबंद करून न्यायवैद्यकीय तपासणीसाठी पाठवले; उर्वरित गोमांस पोलिसांच्या उपस्थितीत नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
छाप्यादरम्यान नौशाद अब्बास कुरेशी याला अटक करण्यात आली; मात्र रेहान नौशाद कुरेशी आणि आहान नौशाद कुरेशी हे दोघे पोलिस धाडेपूर्वी पसार झाले. स्थानिक हिंदू संघटनांनी “पोलिस विभागातील काही खबऱ्यांनी आरोपींना आगाऊ सूचना दिल्याने पलायनास मदत झाली,” असा आरोप केला आहे.
या तिन्ही आरोपींविरोधात यापूर्वीही गोवध प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. वारंवारची तडीपारीची मागणी बजरंग दल, शिवसेना व विश्व हिंदू परिषदेने पुन्हा जोर धरली आहे. संघटनांनी इशारा दिला की, “हिंदूंच्या भावना दुखावणारा गोमांस व्यापार रोखण्यासाठी भविष्यात पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
पोलिस निरीक्षकांनी फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगून, “पुन्हा गुन्हा करणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि जिल्हाबंदीची शिफारस करण्यात येईल,” असे स्पष्ट केले.

(#गोमांस_जप्ती #गडचिरोली_क्राईम #CowSlaughter #BeefSeizure #lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #crime @gadachiroli police )