गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे लाखोंचे प्रवेशद्वार नगर परिषद पाडणार का?

630

– कोट्यवधींचा अंधारमय खेळ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :-  गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवा आणि सुरक्षेच्या नावाखाली शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी उधळला, मात्र परिणामी साधले काहीच नाही. सन २०२४-२५ मध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ३५-३५ लाख खर्चाचे दोन भव्य प्रवेशद्वार आणि वॉल कंपाउंड उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले. एक प्रवेशद्वार पूर्ण करून त्याचे पैसे ठेकेदाराला देऊन टाकले गेले.
मात्र, धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कामासाठी आवश्यक परवानग्या व तांत्रिक मान्यता न घेता थेट सर्व्हिस रोडवर अतिक्रमण करून प्रवेशद्वार उभारण्यात आले. म्हणजेच, कायदे, नियम, जनतेचे पैसे – सगळे धाब्यावर बसवून भ्रष्टाचाराचा खुला खेळ रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर रंगवण्यात आला.
परिणामी, नगरपरिषद गडचिरोलीने २३ जुलै २०२५ रोजीच सदर प्रवेशद्वार अतिक्रमण मानून पाडण्याची नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक व अधिष्ठाता शासकीय महाविद्यालय यांना बजावली. म्हणजेच, शासनाचा कोट्यवधी खर्च करून बांधलेले प्रवेशद्वार आता पाडण्याची वेळ आली आहे.
या बेपर्वाईमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अंधार, असुरक्षितेचा सामना करावा लागत आहे. “शासनाचा ३५-३५ लाख खर्च करून उभारलेले प्रवेशद्वार अतिक्रमण ठरून पाडायची वेळ यावी, हा सरळ सरळ भ्रष्टाचार व जनतेच्या पैशांचा उघड अपव्यय नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
याप्रकरणी रुग्ण व नातेवाईकांची ठाम मागणी आहे की, या प्रकरणाला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून, झालेला लाखो रुपयांचा अपव्यय थेट त्यांच्या खिशातून वसूल करावा.

@lokvrutt.com #lokvruttnews #gadachirolinews #today_news #gadachirolipolice #Maharashtra police #Maharashtra #accident #गडचिरोली #जिल्हासामान्यरुग्णालय #भ्रष्टाचार #सार्वजनिकबांधकामविभाग #अतिक्रमण #नगरपरिषद #नोटीस #आरोग्यसेवा #जनतेचापैसा #अनियमितता #अपव्यय #जबाबदारकोण #गोंधळ #रुग्णालयअंधारात