वैनगंगा पुलावर दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक; गडचिरोली–चंद्रपूर मार्ग ठप्प

924

वैनगंगा पुलावर दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक; गडचिरोली–चंद्रपूर मार्ग ठप्प

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ :- जिल्हा मुख्यालयाजवळील वैनगंगा नदीच्या पुलावर आज सकाळी दोन ट्रकांची समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला. या अपघातामुळे गडचिरोली–चंद्रपूर राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास घडलेल्या या अपघातामुळे कार्यालयीन कामासाठी जाणारे नोकरदार वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

दरम्यान वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून लवकरच मार्ग सुरू होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.