गडचिरोलीत पथदिवे बंद – नगरपरिषदेची कानाडोळा धोरणं ; नागरिक त्रस्त
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ : कलेक्टर कॉलनी कॉम्प्लेक्स ते आयटीआय चौक सिव्हिल लाईन परिसरातील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला असून महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी व युवा सेवा विधानसभा संघटक गणेश धोटे यांनी वारंवार नगरपरिषदेकडे तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे “नगरपरिषदेचे अधिकारी कागदोपत्री स्मार्ट सिटी दाखवतात; पण प्रत्यक्षात नागरिकांना अंधारात ढकलले जात आहे,” असा संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांचे स्पष्ट मत आहे की, नगरपरिषद फक्त ‘डिजिटल उपक्रम’ आणि ‘QR कोड तक्रारी’ यांचा गाजावाजा करते; पण प्रत्यक्षात पथदिवे सुरु करण्यासाठी तात्काळ कारवाई होत नसल्याने ही योजना केवळ दिखावा ठरत आहे.
जर तातडीने पथदिवे सुरु झाले नाहीत तर नगरपरिषदेविरुद्ध आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

@Lokvruttnews #LOKVRUTT.COM
#gadchirolinews #Gadchiroli #MunicipalCouncil #MainSquare #PublicAnger #SmartCity #गडचिरोली #नगरपरिषद #मुख्यचौक #नागरिकांचासंताप #स्मार्टसिटी










