लोकवृत्त न्यूज
सातारा, दि. २ सप्टेंबर :- अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली असून, शेकडो कुटुंबांचे विस्थापन झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असलेल्या या कुटुंबांच्या मदतीसाठी लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडची सीएसआर शाखा असलेली लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) पुढे सरसावली आहे.
२५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मदत उपक्रमांतर्गत फाउंडेशनने पूरग्रस्तांसाठी ३,००० हून अधिक मदत किट तयार केले आहेत. प्रत्येक किटमध्ये तांदूळ, डाळ, कणिक, तेल, मसाले, साबण, टूथपेस्ट, पिण्याच्या पाण्याचे कॅन तसेच ब्लँकेटचा समावेश आहे. नागपूरहून १२ ट्रकमधून पाठवण्यात आलेल्या एकूण २,५४६ क्रेट पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात आले असून, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने त्यांचे वेळेवर वितरण करण्यात येत आहे.
कोनसरी येथील लॉईड्स मेटल्सच्या सीएसआर टीमकडून हे काम पाहिले जात आहे. “लोकांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. साताऱ्यातील कुटुंबांना दिलासा देणे हा या मदत उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुढेही आम्ही गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर राहू,” असे एलआयएफच्या प्रतिनिधीने सांगितले.
लोककल्याणाला प्राधान्य देत सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनने साताऱ्यातील पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.
SataraFloodRelief#lokvruttnews @LOKVRUTT.COM #LloydsInfiniteFoundation #CSRInitiative #FloodRelief2025 #HelpingHands #PatienceAndSupport #CommunityFirst #SataraUpdates #DisasterRelief #TogetherWeCan
#सातारा_पूरग्रस्त #लॉईड्सइन्फिनिटफाउंडेशन #मदतीचा_हात
#आपत्तीतील_साथ #पूरपीडितांना_दिलासा #सामाजिक_जबाबदारी
#समाजासाठी_लॉईड्स #पूरग्रस्तांची_मदत #आपत्तीतील_आधार
#एकत्र_येतो_मदतीला

