सेमाना गार्डनची दुर्दशा : २० रुपयांची फी घेऊनही कचऱ्याचे साम्राज्य, कामगारांची उद्धट वागणूक
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- शहरालगत असलेल्या सेमाना देवस्थान परिसरातील वनविभागाच्या अखत्यारीतील सेमाना गार्डनची परिस्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. नागरिक व पर्यटकांकडून २० रुपये प्रवेश शुल्क वसूल करूनही येथे कचऱ्याचे साम्राज्य, अस्वच्छता व दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पर्यटकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गार्डनमध्ये सर्वत्र प्लास्टिक, खाद्यपदार्थांचे अवशेष, दारूच्या बाटल्या, तसेच घाणीचे ढीग पाहायला मिळतात. या दुर्गंधीमुळे नागरिकांना येथे वेळ घालविणे अशक्य झाले असून, पर्यटकांचा अनुभव त्रासदायक ठरत आहे.
त्यात भर म्हणजे, गार्डनमध्ये तैनात असलेल्या काही कामगारांची पर्यटकांशी उर्मट व उद्धट वागणूक मोठ्या प्रमाणात नाराजीचे कारण ठरत आहे. “प्रवेश फी आकारली जाते, मात्र सुविधा शून्य आणि वागणूक मात्र असभ्य,” अशा शब्दांत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे हे ठिकाण पर्यटनाऐवजी घाण आणि अव्यवस्थेचे केंद्र बनले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून गार्डनची दुरुस्ती, स्वच्छता व कामगारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व पर्यटकांकडून होत आहे.
@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @Gadchirolipolice #publicplace #Maharashtra #लोकवृत्त #सेमाना _गार्डन

