धक्कादायक : जुन्या वादातून कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्या

1075

धक्कादायक : जुन्या वादातून कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्या

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या पुलखल येथे आपसी जुन्या वादातून महिलेची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नवरात्रौत्सव दिनी आज २२ सप्टेंबर रोजी घडली. ललिता देवराव गेडेकर (५५) रा. पुलखल असे मृतक महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला ही शेतावर निंदा करण्यासाठी गेली होती दरम्यान आरोपीने जुन्या वादातून कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. दरम्यान घटनेनंतर आरोपीने पळ काढला असून घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनाकारीता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध पोलिस करीत असून पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.

#livenews #breakingnews #marathinews #latestnews #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroli #lokvruttnews #news #crime