गडचिरोलीत तिहेरी महायुतीची एंट्री ; राष्ट्रवादी–शिवसेना (उबाठा)–मनसेची एकजूट

71

- बिपाशा भुसारे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली, : नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा) आणि मनसे या तिन्ही पक्षांनी अनोखी महायुती करत निवडणूक समीकरणे बदलून टाकली आहेत. महायुतीकडून २२ वर्षीय बिपाशा भुसारे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जाहीर झाल्या असून त्या तुतारी चिन्हावर लढणार आहेत.
महायुतीकडून १८ उमेदवार रिंगणात उतरणार असून त्यात राष्ट्रवादीचे १२, तर शिवसेना (उबाठा) चे ६ उमेदवार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे ही आघाडी मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत अॅड. संजय ठाकरे, वासुदेव शेडमाके, राजेंद्र साळवे, शेमदेव चाफले व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.