Home Breaking News नक्षलविरोधी मोहिमेतील ‘धडाकेबाज’ कामगिरीनंतर एसपी निलोत्पल यांची कोल्हापूरला बदली

नक्षलविरोधी मोहिमेतील ‘धडाकेबाज’ कामगिरीनंतर एसपी निलोत्पल यांची कोल्हापूरला बदली

672

नक्षलविरोधी मोहिमेतील ‘धडाकेबाज’ कामगिरीनंतर एसपी निलोत्पल यांची कोल्हापूरला बदली

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २० : गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून नक्षलविरोधी कारवायांमध्ये प्रभावी ठसा उमटवणारे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर येथे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात नक्षलवादाला मोठा आळा बसल्याने त्यांची कारकीर्द विशेष ठरली आहे.
निलोत्पल यांनी गडचिरोलीत कार्यरत असताना नक्षलविरोधी मोहिमेला नवे बळ दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठ्या कारवाया पार पडल्या, ज्यामध्ये अनेक नक्षलवादी ठार झाले, तर अनेकांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारला. नक्षल्यांचा प्रमुख मोरक्या म्हणून ओळखला जाणारा भूपती यानेही आपल्या साथीदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केल्याची घटना त्यांच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी मानली जाते.
याशिवाय, दुर्गम भागांमध्ये पोलीस उपस्थिती वाढवण्यासाठी नवीन पोलीस मदत केंद्रे व पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे नक्षलप्रवण भागात प्रशासनाची पकड अधिक मजबूत झाली.
शांत, संयमी आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद कमी करण्यास मोलाचे योगदान दिले. त्यांच्या बदलीनंतर सध्या जिल्हा पोलीस अधीक्षकांचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, निलोत्पल यांच्या बदलीमुळे गडचिरोली पोलीस दलात एक कार्यक्षम व कर्तबगार नेतृत्वाची उणीव भासणार असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे.

Don`t copy text!