अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ करणार्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

437

अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ करणार्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल

लोकवृत्त न्यूज
कूरखेडा-दि.२ :- शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणार्या शिक्षकानेच शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेड़छाड़ केल्याचा आरोपावरून त्या शिक्षका विरोधात विनयभंग व पोक्सोचा विविध कलमान्वये आज सांयकाळी कूरखेडा पोलीस स्टेशन येथे गून्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी शिक्षकाचे नाव घनश्याम मंगरू सरदारे वय ४७ असे असून तो तालूक्यातीलच एका जि प उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक आहे शाळेतीलच एका अल्पवयीन मूलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तसेच तिचा शरीराचा मूका घेणे,चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत आज मूलीचे पालकानी मूलगी व गावकर्यासह कूरखेडा पोलीस स्टेशन येथे पोहचत तक्रार दाखल केली या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवि ३५४(अ) ८,१०,१२ पोस्को अंतर्गत गून्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती आहे प्रकरणाचा तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांचा मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत