Home गडचिरोली एलआयसीने आनंदवन येथील रुग्णासाठी बसचे लोकार्पण

एलआयसीने आनंदवन येथील रुग्णासाठी बसचे लोकार्पण

765

एलआयसीने आनंदवन येथील रुग्णासाठी बसचे लोकार्पण

लोकवृत्त न्यूज
वरोरा ८ ऑगस्ट :- भारतीय जीवन विमा निगम द्वारा आनंदवन येथील रुग्णांना वाहतुकीसाठी आनंदवनासाठी वीस सीटर बसचे लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, भारतीय जीवन विमा निगमचे क्षेत्रीय प्रबंधक सनोज कुमार, प्रादेशिक प्रबंधक एन एस राघवा, वरिष्ठ मंडळ प्रबंधक मलिक, विपणन प्रबंधक अजय शुक्ला, दीपेश कटारिया, समाजसेविका पल्लवी आमटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सनोज कुमार यांनी आनंदवनातील निस्वार्थ व निस्पृह सेवेचे कौतुक करतानाच समाजातील सर्वांनी या पुण्यकार्याला हातभार लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच जीवन विमा निगम कडून शक्य त्या मदतीचे आश्वासन दिले. डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनाच्या वतीने आभार व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्यानेच समाजातील कुष्ठ रुग्ण, दिव्यांग बांधवांची सेवा करणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच आनंदवनाचे कार्य पाहण्यासाठी सर्वांनी आनंदवनला भेट देऊन येथील बांधवांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत कुलकर्णी, आभार शाखा प्रबंधक मोहन गोगुलवार यांनी मानले.

Don`t copy text!