Home गडचिरोली १९ ऑगस्टला पुसेर येथे आदिवासी समाज मेळाव्याचे आयोजन

१९ ऑगस्टला पुसेर येथे आदिवासी समाज मेळाव्याचे आयोजन

295

आदिवासी समाजाच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा डॉ. देवराव होळी 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १६ ऑगस्ट :- आदिवासी समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक १९ ऑगस्ट रोज सोमवारला ग्रामसभा पुसेर येथे सकाळी ११ वाजता “आदिवासी समाज मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे .या आदिवासी समाज मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने केले आहे.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुसेर परिसरात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. यानिमित्ताने या कामांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Don`t copy text!