गडचिरोली पोलीस दलाच्या वरीष्ठ अधिकायांनी दुर्गम भागात रक्षाबंधन केली साजरी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि१९ ऑगस्ट:- गडचिरोली जिल्हयातील माओवादग्रस्त व अतिदुर्गम, आदिवासी बहुल भाग म्हणुन ओळखले जाणाया उपविभाग हेडरी अंतर्गत जानेवारी २०२४ रोजी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्र गर्देवाडा येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी महिला पोलीस अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी पोमकें गर्देवाडा येथे भेट देवुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पोमकें गर्देवाडा येथील महिला पोलीस अंमलदार व भगवंतराव आश्रमशाळा, गर्देवाडा येथील विद्यार्थींनींनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभाग घेवुन सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राखी बांधली.
तसेच जिल्ह्रातील विविध पोस्टे/उपपोस्टे व पोमकें येथे रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन यावेळी कार्यक्रमास गावातील महिला पुरुष व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित सर्वांना मान्यवरांच्या हस्ते विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. राखी बांधुन रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.











