उपपोलीस स्टेशन कसनसुर पोलिसांच्या मदतीने रस्त्यावरील खड्डे बुजविले
लोकवृत्त न्यूज
तालुका प्रतिनिधी चामोर्शी दि.६ :- कसनसुर पोलिसांच्या मदतीने कसनसुर ते कोठमी रस्त्यावर असलेले खड्डे
उपपोलीस स्टेशन कसनसुर पोलिसांच्या पुढाकाराने बुजविण्यात आले.
कसनसुर ते कोठमी रस्ता 80 मीटर अत्यंत खराब असल्याने चारचाकी वाहने तसेच दोन चाकी वाहन व इतर आजारी, गरोदर महिला वयस्कर लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता मसराम गुडा गावातील तरुणांनी उपपोलीस स्टेशन कसनसुर पोलिसांच्या पुढाकाराने ५ सप्टेंबर रोजी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले.

ह्यावर कोठमी कसनसुर हद्दीतील लोकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांच्या उपक्रमाची खूप कौतुक केले व रस्ता दुरुस्त केल्याबद्दल मसराम गुडा येथील गावकरी ह्यांचे ही आभार मानले.
रस्ता दुरुस्त करण्यासाठी srpf कंपनी नायक ओव्हाळ तसेच कवडो, पाल ह्यांचे सहकार्य लाभले.










