गडचिरोली : पोलिस नक्षल चकमक , एक जवान जखमी

1012

गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांचे तळ केले नष्ट

– लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ११ : जिल्ह्याच्या दक्षिण भागात गडचिरोली पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली असून या चकमकीत पोलिस दलाने नक्षल्यांचा तळ नष्ट केला आहे. तर या चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्यांना उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दिरांगी आणि फुलनार या गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून नक्षली तळ ठोकून असल्याच्या विश्वसनीय माहितीनुसार अहेरी चे अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली C ६० जवानांची तुकडी सदर परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत पोलिस दलाने नक्षल्यांचे तळ नष्ट केले. या चकमकीत एक जवान जखमी झाल्याने नागपूर येथे हेलिकॉप्टरने वैद्यकीय उपचारासाठी हलवले जात आहे. परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.