देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त :

98

: चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केली मोठी कारवाई

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर : जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२ मार्च २०२५ रोजी मोठी कारवाई केली. मुखबिराच्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील आरोपी संगम संभाजी सागोरे (वय-२८, रा. मित्रनगर, चंद्रपूर) याच्याकडून एक गावठी बनावटी देशी कट्टा आणि जिवंत ९ एम. एम. काडतूस जप्त करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात विविध कारवायांसाठी पेट्रोलिंग करत असताना मुखबिराद्वारे माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी संगम संभाजी सागोरे हा चुना भट्टी बस स्टॉपवर अग्निशस्त्र (हत्यार) बाळगून बसलेला आहे.मुखबिराच्या माहितीवरून आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडून एक लोखंडी गावठी बनावटी देशी कट्टा आणि एक नग जिवंत ९ एम. एम. काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीवर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपासासाठी आरोपीला पोरटे बल्लारपूर येथील पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन साहेब, चंद्रपूर आणि अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली. यामध्ये पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्‌ठ्यार, पोहवा/दीपक डोंगरे, पोशि/प्रशांत नागोसे, पोशि/किशोर वाकाटे, पोशि/शशांक बदामवार, पोशि/अमोल सावे आणि चापोहवा/दिनेश अराडे हे सर्व स्थानिक गुन्हे शाखेचे सदस्य सहभागी होते.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #CHANDRAPUR POLICE @Chandrapurpolice #crime #LCB )