अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मार्खंडा येथे छत्री वाटप;

117

महिलांच्या नेतृत्वात रात्री १० वाजता कार्यक्रमाची उत्साही सजावट

लोकवृत्त न्यूज
आष्टी दि. २८: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मौजा मार्खंडा (कंसोबा) येथे विशेष छत्री वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी मंत्री राजे डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल कोवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
विशेष म्हणजे, हा कार्यक्रम रात्री १० वाजता महिलांच्या नेतृत्वात पार पडला. चामोर्शी तालुका अध्यक्ष सौ. रुपाली दुधबावरे, अनुसूचित जाती सेलच्या तालुका अध्यक्षा श्रीमती अर्चना निमसरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण आयोजनाची धुरा लिलया सांभाळली.
महिला कार्यकर्त्यांनी ‘रात्र आहे का अडथळा?’ हे वास्तव सिद्ध करत गावकऱ्यांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविषयी दृढ विश्वास निर्माण केला. छत्री वाटपाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वही निभावले गेले.
गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कौतुकाचे भाव उमटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयघोषात आणि एकतेच्या घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर निनादून गेला. या कार्यक्रमात महिला व पुरुष कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती जाणवून दिली.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal )