गडचिरोली : ०६ वरिष्ठ जहाल माओवाद्यांचे पोलीसांसमोर आत्मसमर्पण

536

– माओवादी चळवळीला मोठा धक्का :

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २४ :- गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, ०६ वरिष्ठ माओवाद्यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या समोर आज २४ सप्टेंबर रोजी गडचिरोली येथे आत्मसमर्पण केले. यात दोन डिव्हीसीएमसह एक कमांडर, दोन पीपीसीएम व एक एसीएमचा समावेश असून, या सर्वांवर शासनाने एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पितांमध्ये भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे (डिव्हीसीएम, उत्तर बस्तर डिव्हीजन मास टिम) वय ५८ वर्षे, रा. करंचा ता. अहेरी, जि. गडचिरोली व पत्नी विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक, (डिव्हीसीएम, माड डिव्हीजन, डीके प्रेस टिम इंचार्ज), वय ५६ वर्ष, रा. मांड्रा, ता. अहेरी, जि. गडचिरोली, कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी, (कमांडर, पश्चिम ब्युरो टेलर टिम), वय ३४ वर्षे, रा. पडतानपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी (पीपीसीएम, कंपनी क्र. १०), वय ३९ वर्षे रा. पामरा, ता. भैरामगड, जि. बीजापूर (छ.ग.), समीर आयतू पोटाम, (पिपीसीएम, दक्षिण ब्युरो टेक्नीकल टिम), वय २४ वर्षे, रा. पुसणार, ता. गंगालूर, जि. बीजापूर (छ.ग.), नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी, (एसीएम, अहेरी दलम), वय २८ वर्षे, रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.
पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सी-६०पथक, गडचिरोली पोलीस, सिआरपीएफ व एसआरपीएफच्या जवानांचा सत्कार करण्यात आला. कवंडे, कोपर्शी-फुलनार आणि मोडस्के जंगलातील चकमकींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पथकांचा गौरवही करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे याच्यावर १६लाख रुपये, विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक हिच्यावर १६ लाख, कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जीहिच्यावर ०८ लाख, नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी याच्यावर ०८ लाख, समीर आयतू पोटाम याच्यावर ०८लाख, नवाता ऊर्फ रुपी ऊर्फ सुरेखा चैतू मडावी हिच्यावर ०६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
तर आत्मसमर्पणानंतर शासनाने पुनर्वसन व बक्षीस रकमेची घोषणा केली असून, भिमन्ना-सुखलाल जोडीला ८.५ लाख, विमलक्का ५.५ लाख, कविता ५.५ लाख, नागेश ५ लाख, समीर ४.५ लाख, नवाता ४.५ लाख रुपये तसेच जोडप्यांसाठी अतिरिक्त १.५ लाख रुपये देण्यात आले आहेत. (भिमन्ना ऊर्फ सुखलाल ऊर्फ व्यंकटेश मुत्तय्या कुळमेथे व त्याची पत्नी विमलक्का ऊर्फ शंकरअक्का विस्तारय्या सडमेक) तसेच (नागेश ऊर्फ आयताल गुड्डी माडवी व त्याची पत्नी कविता ऊर्फ शांती मंगरु मज्जी). आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण 04 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
यावेळी पोलीस महासंचालक म्हणाल्या, “हिंसेचा मार्ग सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा. राज्य शासन व पोलीस दल तुमच्या पुनर्वसनाची पूर्ण जबाबदारी घेतील.”
याशिवाय, अति-संवेदनशील कवंडे पोलिस पोस्टेला भेट देऊन जवानांच्या परिश्रमांचे कौतुक करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी मोहिमेमुळे २०२५ मध्ये आतापर्यंत ४० जहाल माओवादी आत्मसमर्पित झाले असून, २००५ पासून तब्बल ७१६ माओवादी पोलीसांसमोर आत्मसमर्पित झाले आहेत.
#gadchirolinews #lokvruttnews @lokvrutt.com #gadchirolipolice #Gadchiroli #MaoistSurrender #MaharashtraPolice #AntiNaxalOperation #SecurityForces #C60Commandos #CRPF #SRPF #NaxalAffectedAreas #PeaceAndDevelopment #Mainstream #Rehabilitation #IndiaNews #BreakingNews #LawAndOrder